फसवणूक प्रकरणी दोघांना एक वर्षाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फसवणूक प्रकरणी दोघांना एक वर्षाचा
फसवणूक प्रकरणी दोघांना एक वर्षाचा

फसवणूक प्रकरणी दोघांना एक वर्षाचा

sakal_logo
By

ठाणे, ता. २६ (वार्ताहर) : ठाण्याच्या कोपरी आणि प्लॉवरव्हेली परिसरातील नायट्रो बिस्पोक फिटनेस सेंटरमध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी फिटनेस सेंटरच्या मालकाला ४.७७ लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी न्यायमूर्ती नदीम ए. पटेल यांनी आरोपी अल्पेश अशोक लाड आणि शैलेश शांताराम सोनावले यांना दोषी ठरवत एक वर्षाचा कारावास आणि ३ हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली.
आरोपी अल्पेश लाड आणि शैलेश सोनावले हे दोघेही नायट्रो बीस्पोक फिटनेस सेंटरमध्ये कामाला होते. दोघांकडे फिटनेस सेंटरच्या देवाणघेवाणीचा व्यवहार होता. सेंटरमध्ये दोघांनी मिळून कॉम्प्लिमेंटरी मेंबर्सच्या बनावट पावत्या तयार केल्या. या पावत्यांद्वारे त्यांनी तब्बल ४ लाख ७७ हजार ८९५ रुपयांची अफरातफर करीत फसवणूक केली. फसवणूक समोर येताच फिटनेस सेंटरच्या सोनिया पी. डावखरे यांनी मुंबईच्या गावदेवी पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. यानुसार न्यायमूर्ती नदीम ए. पटेल यांनी दोघांना एक वर्षाचा कारावास आणि ३ हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली.