सेवानिवृत्तधारकांचे विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवानिवृत्तधारकांचे विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन
सेवानिवृत्तधारकांचे विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन

सेवानिवृत्तधारकांचे विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन

sakal_logo
By

ठाणे, ता. २३ : सेवेत नियमित असलेल्या बंधपत्रित सहायक परिचारिका प्रसविका (ए.एन.एम.) यांच्या मागण्यांसाठी पेन्शनर वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने २७ फेब्रुवारी रोजी ठाणे जिल्हा परिषदेच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव रामचंद्र मडके यांनी दिली. सेवा बंधपत्रित कालावधीच्या मूळ दिनांकापासून नियमित करणे, हयातीचा दाखला देण्याबाबत मुख्यालयास पद्धत अवलंबिली जाते, ती पंचायत समिती स्तरावर अवलंबण्याबाबत गट विकास अधिकारी यांना निर्देश द्यावेत, दरमहाचे निवृती वेतनासाठी मुख्यालयाकडून अनुदान देऊनही पंचायत समिती स्तरावर वेळेवर देण्यात यावे, यासह अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. १५ जुलै २०२२ रोजी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संघटनेशी चर्चा करून मागण्या १५ दिवसांत सोडवण्यात येतील, असे आश्वासित केले होते. मात्र, अद्यापही एकाही मागणीचे प्रशासनाकडून निराकरण केले गेले नसल्याने आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.