मराठी भाषादिनानिमित्ताने कवी संमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी भाषादिनानिमित्ताने कवी संमेलन
मराठी भाषादिनानिमित्ताने कवी संमेलन

मराठी भाषादिनानिमित्ताने कवी संमेलन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने साजऱ्या केल्या जाणाऱ्या मराठी भाषा गौरवदिनी ठाणे महानगरपालिकेतर्फे निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सोमवारी (ता. २७) सायंकाळी ६ वाजल्यापासून ठाणेकर रसिकांना राज्याच्या विविध भागांतील कवींच्या काव्य सादरीकरणाचा आस्वाद घेता येणार आहे. ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. निमंत्रितांच्या कवी संमेलनात प्रा. डॉ. प्रज्ञा पवार, ठाण्याचे सहायक पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, महेश केळुसकर, अशोक बागवे, विजय चोरमारे, संजीवनी तडेगावकर, आप्पा ठाकूर, अनंत राऊत, अशोक कोतवाल, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आदी मान्यवर कवी सहभागी होणार आहेत. महेश केळुसकर आणि विजय चोरमारे या संमेलनाचे सूत्रसंचालन करणार आहेत. सोमवारी सायंकाळी ६ वाजता गडकरी रंगायतनमध्ये होणारा हा काव्यसोहळा विनामूल्य असून त्यास रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.