शिवाजी पार्कमधील धूळ नियंत्रणाचे कंत्राट रद्द

शिवाजी पार्कमधील धूळ नियंत्रणाचे कंत्राट रद्द

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २३ : दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागतो. मैदानातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी या ठिकाणी मातीचा भराव घालून हिरवळ तयार करण्यात आली होती. या हिरवळीच्या देखभालीसाठी तीन वर्षे कंत्राटदाराचीही नेमणूक केली होती; परंतु हे कंत्राट आता पालिकेने रद्द केले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवाजी पार्क मैदानावरील धुळीवर तोडगा काढण्यासाठी येथे हिरवळ तयार करण्यात आली होती; परंतु मैदानाची हिरवळ राखण्यासाठी पाणी शिंपडण्याला वर्षाकाठी एक कोटी रुपये खर्च करण्याची आवश्यकता नाही, अशी सबब पालिकेकडून देण्यात आली आहे. त्या ठिकाणी कंत्राटी कामगारांची मदत घेऊन मैदानावर पाणी मारत हिरवळ राखण्यासाठी यापुढे प्रयत्न करण्यात येणार आहेत. पालिकेच्या रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून जमा होणऱ्या पाण्याचा वापर हिरवळीवर करण्यात येणार आहे. त्यासाठी पर्जन जलवाहिन्याही टाकण्यात आल्या आहेत.

धुळीचे संकट कमी व्हावे; तसेच संपूर्ण परिसरात हिरवळ आणि माती टिकून रहावी, यासाठी संपूर्ण परिसरात तुषार सिंचन प्रणाली कार्यरत करण्यात आली आहे. मैदानातील समस्या तत्काळ सोडवता याव्यात, तसेच मैदानातील साफसफाई आणि देखभाल दुरुस्ती, यासाठी तीन वर्षांचे कंत्राट देण्यात आले होते; परंतु पालिकेने हे तीन वर्षांचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com