जीएसटी अधिकाऱ्यांच्या
घरावर सीबीआयचे छापे

जीएसटी अधिकाऱ्यांच्या घरावर सीबीआयचे छापे

मुंबई, ता. २३ : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी मुंबई आणि पुण्यातील जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या घरावर सीबीआयकडून गुरुवारी छापेमारी करण्यात आली. सीबीआय अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांसह अनेक कागदपत्रेही जप्त करण्यात आले. ऐन पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांकडून छापेमारी करण्यात आल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. जीएसटी विभागातील एक प्रकरण बंद करण्यासाठी अधिकाऱ्यांनी एक कोटी रुपयांची लाच मागितल्याची तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयने संशयित अधिकाऱ्यांच्या घरावर छापे मारले. मुंबई आणि पुण्यातील अनेक ठिकाणी केलेल्या कारवाईत सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चार लाख रुपयांची रोकड, सोने आणि संशयित कागदपत्रेही जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com