Tue, June 6, 2023

मातीचा ढिगारा कोसळून दोघांचा मृत्यू
मातीचा ढिगारा कोसळून दोघांचा मृत्यू
Published on : 23 February 2023, 3:34 am
ठाणे, ता. २३ (वार्ताहर) : इमारतीच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना ठाण्यातील नौपाडा बी-केबिन परिसरात घडली. या घटनेत अन्य एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. हबीब शेख आणि रंजीत अशी दोघा मृतांची नावे आहेत. नौपाड्यातील सत्य नीलाई इमारतीचे बांधकाम सुरू आहे. गुरुवारी (ता. २३) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हबीब शेख, रंजीत आणि निर्मल राब हे तिघेही काम करत असताना त्यांच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथकाने मदतकार्य करून तिघांनाही बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी हबीब आणि रंजीत यांना मृत घोषित केले.