माजी स्थायी समिती सभापतीला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी स्थायी समिती सभापतीला अटक
माजी स्थायी समिती सभापतीला अटक

माजी स्थायी समिती सभापतीला अटक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : वस्तू व सेवा कर (जीएसटी) जमा करण्यात आला; परंतु सरकारला कर न भरल्याचा ठपका ठेवत ठाणे महापालिकेतील माजी ज्येष्ठ व स्थायी समिती सभापती संजय भोईर यांना गुरुवारी (ता. २३) जीएसटी भिवंडी आयुक्तालयाने अटक केली. त्यांना न्यायालयाने ९ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

जीएसटीच्या भिवंडी आयुक्तालयाने विक्की एंटरप्राईझच्या विरोधात संकलित, परंतु न भरलेल्या सेवा कराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये प्राप्तकर्त्यांकडून दोन कोटी २६ लाख रुपये वसूल केले; परंतु सेवा कर दायित्व सोडले नसल्याचे तपासात पुढे आल्याचे म्हटले. तसेच तपासादरम्यान गोळा केलेल्या भौतिक पुराव्यांच्या आधारे, संजय भोईर यांना गुरुवारी सीजीएसटी कायद्याच्या कलम १७४ (२) सह वित्त कायदा, १९९४ च्या कलम ८९(१)(ii) अन्वये अटक करण्यात आली. तसेच पडताळणीदरम्यान संबंधित विभागाच्या लक्षात आले की, भोईर यांनी सन २००८ मध्ये सेवा कर नोंदणी केली आहे आणि फक्त २०१२-१३ आणि २०१३-१४ या कालावधीसाठी एसटी-३ रिटर्न भरले आहेत. तसेच त्यांनी २००८-०९, २००९-१०, २०१०-११, २०११-१२, २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ आणि २०१७-१८ (एप्रिल, २०१७ ते जून २०१७) या कालावधीसाठी रिटर्न भरलेले नाहीत किंवा सेवा कर भरलेले नाही, असा ठपका ठेवला आहे. या
विभागाकडे उपलब्ध कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे, जमा केलेला, परंतु सरकारला न भरलेला सेवा कर २.२६ कोटी रुपये इतका असल्याने सीजीएसटी कायदा, २०१७ च्या कलम १७४ (२) सह वित्त कायदा, १९९४ च्या कलम ८९(१)(ii) अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली.

आतापर्यंत २३ जण अटकेत
सेवा कर म्हणून केंद्र सरकारच्या क्रेडिटमध्ये जमा केलेली रक्कम भरण्यात अयशस्वी झालेले हे प्रकरण सीजीएसटी मुंबई विभागाने कर फसवणूक करणाऱ्या आणि कर चुकवणाऱ्यांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग आहे. आतापर्यंत सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाने गेल्या वर्षभरात २३ जणांना अटक केली आहे.