पवई-जेवीएलआर रस्ता खचला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पवई-जेवीएलआर रस्ता खचला
पवई-जेवीएलआर रस्ता खचला

पवई-जेवीएलआर रस्ता खचला

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २४ (बातमीदार) : पवई-जोगेश्वरी-विक्रोळी लिंक द्रुतगती मार्गावरील सुवर्ण मंदिरजवळ रस्ता खचल्याची घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली. ऐन रहदारीच्या वेळीच रस्ता खचल्याने वाहनचालकांची एकच तारांबळ उडाली. दुपारची वेळ असल्याने नेहमीपेक्षा या रस्त्यावर वर्दळ कमी होती. यावेळी निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवल्याने नागरिक आणि वाहनचालकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, संध्याकाळच्या वेळेत या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत असते. त्यात हा रस्ता खचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये यासाठी पालिका अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल होत खचलेल्या रस्त्याची पाहणी करत रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले.