शहापूर ते ठाणे पदयात्रेचा ठाण्यात समारोप

शहापूर ते ठाणे पदयात्रेचा ठाण्यात समारोप

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, दरमहा अर्ध्या पगाराएवढी पेन्शन, मानधनवाढीच्या आश्वासनाची पूर्तता करणे, सुसज्ज अंगणवाडी केंद्रे, कार्यक्षम मोबाईल देणे आदी मागण्यांसाठी शहापूर ते ठाणे अशी पदयात्रा अंगणवाडी सेविकांनी काढली होती. या पदयात्रेत जिल्ह्यातील ३०० अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. तीन दिवस चालेल्या या पदयात्रेचा शुक्रवारी (ता. २४) ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप करण्यात आला. या वेळी जिल्ह्यातील सुमारे दीड हजार अंगणवाडी सेविकांनी सहभाग नोंदवला होता. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना अंगणवाडी सेविकांनी मागण्यांचे निवेदन दिले.
महाराष्ट्रातील तसेच पालघर व ठाणे जिल्ह्यामध्ये बालमृत्यूचे व कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. सध्या अंगणवाडीतील लाभार्थींना दररोज शासनाकडून आठ रुपयांचा पुरक पोषण आहार २०१८ सालापासून दिला जातो. एवढ्या रक्कमेमध्ये योग्यते पोषण होऊ शकत नाही. गेल्या पाच वर्षात महागाई तिपटीने वाढली आहे. त्यामुळे पूरक पोषण आहारामध्ये वाढ केली पाहिजे. केंद्र सरकारने महिला व बालविकास विभाग खात्याच्या बजेटमध्ये अपुरी तरतूद केली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना योग्य सेवा पुरवल्या जाऊ शकत नाही. अंगणवाडी सेविकांना २०१९ मध्ये अंगणवाडीचे कामकाज करण्यासाठी मोबाईल देण्यात आले होते व ते बंद पडले आहे. त्यामुळे त्यांना विनाविलंब मोबाईल मिळणे, आवश्यक आहे. नवीन मोबाईल देणे, पदोन्नती, अंगणवाडीचे केंद्राचे नोव्हेंबर २०२१ पासूनचे थकित भाडे, थकित टीएडीए व श्रीमती. कमल वारे यांना मा. कामगार व औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार पुर्ववत कामावर घेणे आदी प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रलंबित मागण्यांसाठी शहापूर ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय अशी पदयात्रा अंगणवाडी सेविकांनी काढली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com