पश्चिम रेल्वेच्या सर्व गाड्यांमध्ये हँड हेल्ड टर्मिनल

पश्चिम रेल्वेच्या सर्व गाड्यांमध्ये हँड हेल्ड टर्मिनल

टीसींकडील हॅण्ड हेल्ड यंत्रामुळे
‘वेटिंग’वरील प्रवाशांना दिलासा

पश्चिम रेल्वेमार्गावर धावणाऱ्या सर्व लांब पल्ल्यांच्या मेल-एक्सप्रेस गाड्यांमध्ये तिकीट तपासनीसांना हॅण्ड हेल्ड टर्मिनल (एचएचटी) यंत्र रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे कागदी तक्ता घेऊन फिरण्याचा त्यांचा त्रास कमी होणार असून प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना प्राधान्याने आसन उपलब्ध होणार आहे. सध्या पश्चिम रेल्वेने २९८ गाड्यांमधील १३८५ तिकीट तपासनीसांना ‘टॅब’सारखे दिसणारे हॅण्ड हेल्ड यंत्र दिले आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले, की पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या सर्व २९८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये हॅण्ड हेल्ड टर्मिनल प्रदान करण्यात आले आहेत. आरक्षित डब्यामध्ये रिकामी आसन असल्यास त्याची माहिती डिजिटली पद्धतीने उपलब्ध होणार आहे. ‘एचएचटी’ प्रणाली तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना आरएसी आणि प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना रिकाम्या बर्थचे वाटप करण्यास मदत करतात आणि सर्व्हरला सीट वा बर्थ उपलब्धतेबाबत अद्ययावत माहिती पाठविण्यासाठीही मदत करतात. रिअल-टाईम माहिती एचएचटीद्वारे पीआरएसला जीपीआरएसद्वारे पाठवली जाते. त्यानंतरच्या स्थानकांवर प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना रिक्त बर्थ वाटप केले जाऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com