ठाण्याचे तापमान ४२.२ अंशांवर

ठाण्याचे तापमान ४२.२ अंशांवर

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २४ : राज्यातून थंडीने काढता पाय घेतल्यानंतर हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला होता. त्यात ठाणे शहरात गेल्या सहा दिवसांत तापमानाचा पारा ३८ ते ४१ अंश सेल्सिअसच्या घरात घुटमळत असल्याने हा अंदाज खरा ठरल्याचे बोलले जात आहे. एकीकडे ठाणेकरांच्या अंगाची लाहीलाही होत असताना, दुसरीकडे शुक्रवारी या तापमानाने ४२.२ अंश सेल्सिअसची नोंद केल्याने भविष्यात उकाडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

गेल्या वर्षी २०२२ मध्ये होळीच्या दुसऱ्याच (१७ मार्च) दिवशी ठाणे शहराचे तापमान ४५.६ अंश सेल्सिअस नोंदवले होते. हवामान विभागाने १४ ते १६ मार्च २०२२ या कालावधीत मुंबई, रायगड, पालघरसह ठाणे जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार ठाण्याचा पारा ४० अंशांच्या वर गेला होता. यंदाही १९ आणि २३ फेब्रुवारी या कालावधीत उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविला होता. या कालावधीत ठाण्यातील तापमानाचा पारा ३८ ते ४२ अंश सेल्सिअसच्या घरात नोंदवला गेला. त्यामुळे आगामी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

ठाण्याचे असे होते तापमान
तारीख तापमान
१९ फेब्रुवारी ४१.९
२० फेब्रुवारी ३९.४
२१ फेब्रुवारी ३९.३
२२ फेब्रुवारी ३८.४
२३ फेब्रुवारी ४१.८
२४ फेब्रुवारी ४२.२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com