स्वखर्चाने गतिरोधकावर पांढरे पट्टे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वखर्चाने गतिरोधकावर पांढरे पट्टे
स्वखर्चाने गतिरोधकावर पांढरे पट्टे

स्वखर्चाने गतिरोधकावर पांढरे पट्टे

sakal_logo
By

मोखाडा, ता. २५ (बातमीदार) : मोखाडा तालुक्यातील मुख्य रस्त्यांसह गाव पाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांवर गतिरोधक टाकण्यात आले आहेत. मात्र या ठिकाणी कोणतेही दर्शक फलक अथवा गतिरोधकावर पांढरे पट्टे टाकण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अनेक दुचाकींचे अपघात झाले आहेत. अशाच अपघातात कारेगाव-कडुचीवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच देवराम कडू यांचा मृत्यू झाला आहे. यापुढे असे अपघात घडू नये म्हणून देवराम कडू यांचा मुलगा आकाश कडू आणि त्यांच्या मित्रांनी रस्त्यावरील गतिरोधकावर पांढरे पट्टे मारण्याचा स्तुत्य ऊपक्रम सुरू केला आहे.
कारेगाव-कडुचीवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच देवराम कडु यांचा मोखाडा-खोडाळा-विहीगाव या राज्यमार्गावर मोखाड्याजवळ बेकायदा घातलेल्या गतीरोधकावर दुचाकीचा ६ फेब्रुवारी रोजी अपघात झाला होता. या अपघातात देवराम कडु यांचा मृत्यू झाला. तालुक्यातील सर्वच रस्त्यावर गतीरोधक टाकण्यात आले आहेत. मात्र, या ठिकाणी बांधकाम विभागाने कोणतेही दर्शक फलक लावलेले नाहीत. तसेच गतीरोधकाच्या मागे पुढे अथवा गतिरोधकावर पांढरे पट्टे मारलेले नाहीत. त्यामुळे दुचाकींचे अपघात होत आहेत.

----------------------
दुसऱ्यावर प्रसंग न ओढवण्यासाठी प्रयत्न
गतीरोधकामुळे अपघात रोखण्यासाठी दिवंगत सरपंच देवराम कडु यांचा मुलगा आकाश कडू आणि त्यांचे सहकारी मगेश दिवे, रेवण कडू, मकुद कडू,
आशोक भोये, कुष्णा ठोबरे, पिंटू ठोबरे, निखील हमरे आणि अकुश बुधर यांनी खोडाळा-विहीगाव या राज्यमार्गावरील गतिरोधकावर स्वखर्चाने पांढरे पट्टे मारण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आपल्यावर ओढवलेला दुखद प्रसंग दुसऱ्या कोणावर ओढवु नये, वाहन चालकास गतिरोधक लांबून दिसावा व अपघात टळावा. यासाठी आपण हा उपक्रम हाती घेतल्याचे आकाश कडू यांनी सांगितले आहे.