
जुचंद्रमध्ये कर्मवीर विद्यालयात सदिच्छा समारंभ
विरार, ता. २५ (बातमीदार) : जुचंद्र येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या प्रांगणात बी. जी. पाटील रंगमंचावर दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ पार पडला. या समारंभास आगरी विकास परिषद जूचंद्रचे अध्यक्ष दयानंद गावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दहावीच्या विद्यार्थ्यांनी भाषणात शाळेविषयी आठवणींना उजाळा देत शाळेमुळे उत्तम शिक्षण व संस्कार मिळाल्याचे सांगितले. आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छापर भाषणे केली. स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, सदस्य हरिहर पाटील, दयानंद गावडे, जितेंद्र भोईर, प्राचार्य पगार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयास क्रीडा साहित्य घेण्यासाठी आर्थिक मदत केली. तसेच दहावीला नियमित उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास उपाध्यक्ष विवेकानंद पाटील, निवृत्ती म्हात्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुषार म्हात्रे, सूत्रसंचालन प्रज्ञा भोईर व आभार प्रदीप पाटील यांनी मानले.