परुळेकर महाविद्यालयात रक्तदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परुळेकर महाविद्यालयात रक्तदान शिबिर
परुळेकर महाविद्यालयात रक्तदान शिबिर

परुळेकर महाविद्यालयात रक्तदान शिबिर

sakal_logo
By

कासा, ता. २६ (बातमीदार) : परुळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्‍घाटन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते अजित नार्वेकर, तलासरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस. रोठे, गावित व प्राचार्य डॉ. भगवानसिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरामध्ये महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी सहभाग घेतला. डहाणू येथील छेडा रक्तपेढीमार्फत रक्त संकलन करण्यात आले. ७० युवकांनी, प्राध्यापकांनी रक्तदान केले. महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगून रक्तदात्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. रितेश रायचना यांनी केले.