Wed, May 31, 2023

घाटकोपरमध्ये बचत गटांना स्टॉल वाटप
घाटकोपरमध्ये बचत गटांना स्टॉल वाटप
Published on : 25 February 2023, 12:48 pm
घाटकोपर, ता. २५ (बातमीदार) ः मुंबई महापालिका एन विभागातील नोंदणीकृत बचत गटांना केंद्राच्या विशेष योजनेअंतर्गत स्टॉलवाटप करण्यात आले. पालिकेच्या एन विभाग कार्यालयांतर्गत नोंदणीकृत असलेल्या पंचशील महिला बचत गटास शुक्रवारी (ता. २५) ‘एक स्थानक, एक उत्पादन’ या भारत सरकारच्या योजनेअंतर्गत घाटकोपर रेल्वे स्थानक येथे स्टॉल देण्यात आला. या वेळी महिलांनी उत्पादित केलेल्या इमिटेशन ज्वेलरी ठेवण्यात आली होती. याप्रसंगी एन विभागाच्या समाज विकास अधिकारी सरला राठोड, प्रशांत अभंग, स्टेशन प्रबंधक विद्याधर यादव आणि यशवंत लाकडे तसेच धनाजी देसाई हे उपस्थित होते.