बोर्डीत खगोल विज्ञान प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोर्डीत खगोल विज्ञान प्रदर्शन
बोर्डीत खगोल विज्ञान प्रदर्शन

बोर्डीत खगोल विज्ञान प्रदर्शन

sakal_logo
By

बोर्डी, ता. २४ (बातमीदार) : राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने अध्ययन संस्था मुंबई, मराठी विज्ञान परिषद बोर्डी शाखा आणि माजी विद्यार्थी संघ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने २ते ४ मार्च या कालावधीत बोर्डी येथील एस. आर. सावे शिबिर निवास (कॅम्पिंग ग्राउंड) येथे खगोल विज्ञान प्रदर्शन आणि कृती सत्र आयोजित करण्यात आले आहे. शालेय पातळीवर खगोलशास्त्राचा वापर करायला विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे, यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कृती सत्र प्रदर्शनास ग्रहताऱ्यातील फरक, ग्रहाचे मार्ग, चंद्र सूर्यग्रहणे त्याचे विज्ञान, धुमकेतू, लघुग्रहाचा पट्टा, तेजोमय यांची माहिती दिली जाणार आहे. तसेच या शिबिरात घनता, गुरुत्वाकर्षण, या विषयाची दालने असणार आहेत. परिसरातील विद्यार्थ्यांनी व पालकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्ययन संस्थेचे संचालक राजीव वर्तक व मराठी विज्ञान परिषदेच्या बोर्डी शाखेच्या अध्यक्षा उर्मिला करमरकर यांनी केले आहे.