वाचकांसाठी पुस्तकांचा अमूल्य ठेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाचकांसाठी पुस्तकांचा अमूल्य ठेवा
वाचकांसाठी पुस्तकांचा अमूल्य ठेवा

वाचकांसाठी पुस्तकांचा अमूल्य ठेवा

sakal_logo
By

प्रभादेवी, ता. २५ (बातमीदार) : वाचनाने आपल्या ज्ञानात भर पडते, याच उद्देशाने मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने वाचकांसाठी हजार नामवंत प्रकाशकांच्‍या दहा हजारांहून अधिक पुस्तकांचा ठेवा पुस्तकप्रेमी व वाचकांना पुस्तक प्रदर्शनातून घेता येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज पार्क उद्यान येथील स्व. मीनाताई ठाकरे स्मारकाजवळ मॅजेस्टिक बुक डेपो यांच्या सहकार्याने पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले आहे. वाचकांसाठी हे प्रदर्शन उद्या २७ फेब्रुवारीला सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत पाहता येईल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी (ता. २५) या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी मनसे नेते अविनाश अभ्यंकर, प्रकाश महाजन, संदीप देशपांडे, मॅजेस्टिक बुक डेपोचे अक्षय कोठावळे व पुस्तकप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाचन संस्कृती टिकून राहावी, यासाठी पुस्तक प्रदर्शन वर्षभर विविध ठिकाणी घेण्यात यावे, असा सल्ला त्यांनी आयोजकांना दिला. तसेच विद्यार्थ्यांना रामायण, महाभारत कळावे, यासाठी त्याच्या १ हजार प्रती विकत घेऊन त्या स्थानिक शाळांना देणार असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.
कादंबरी ते विविध साहित्य अशी वाचनीय पुस्तके याचबरोबर ययाती, छावा, छत्रपती संभाजी महाराज, पुरुषार्थ, शहा जिजाई, छत्रपती शिवाजी महाराज, आज्ञा पत्र अशी अनेक पुस्तके या प्रदर्शनात मांडण्यात आली असून वाचकांना ही पुस्तके २० टक्के सवलतीत घेता येतील, असेही आयोजकांनी सांगितले.