ठाण्याचा बॅडमिंटनपटू सार्थकची झेप

ठाण्याचा बॅडमिंटनपटू सार्थकची झेप

ठाणे, ता. २५ : ठाणे बॅडमिंटन अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या सार्थक रोकडे याने उत्तुंग झेप घेतली आहे. अखिल भारतीय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एफसीआय) आंतरविभागीय स्पर्धेमध्ये नेत्रदीपक कामगिरी केल्यानंतर आता त्याची एफसीआयच्या पश्‍चिम विभागीय संघात निवड करण्यात आली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय आंतर विभागीय अजिंक्यपद स्पर्धेत सार्थकने दिमाखदार कामगिरीने सर्वांनाच आपल्या खेळाची दखल घेण्यास भाग पाडले आहे. सार्थक याने दोन्ही गटांमध्ये चमकदार कामगिरी केली आणि याच कामगिरीचे फळ म्हणून एफसीआयच्या पश्‍चिम विभागीय संघामध्ये सार्थकची निवड करण्यात आली आहे.

अंजना नायरचे रौप्यपदक
ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण अकादमीचे ज्युनियर बॅडमिंटनपटूसुद्धा धडाकेबाज कामगिरी करत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या व गेली अनेक वर्षे होत असलेल्या अतिशय मानाच्या मनोरा राज्यस्तरीय खुल्या स्पर्धेत ठाणेकर अंजना नायर हिने १३ वर्षाखालील वयोगटात रौप्यपदक जिंकले आहे. लहानणापासूनच ठाणे बॅडमिंटन अकादमीमध्ये धडे गिरवणाऱ्या अंजनाने गतवर्षी हीच स्पर्धा वेगळ्या वयोगटात जिंकण्याची कामगिरी केली होती. आणि आता रौप्यपदक प्राप्त करून तिने आपले सातत्य कायम राखले आहे. अन्वेशा सिंग हिला उपांत्य फेरीच्या सामन्यात २२-२० असे नमवून अंजनाने अंतिम फेरीत धडक मारली. परंतु, अंतिम सामन्यात अटीतटीच्या लढतीत तिला हार पत्करावी लागली.

शाळेकडून गौरव
शालेय स्पर्धांमधील उत्तम कामगिरीसाठी अंजनाचा रविशंकर विद्यामंदिर शाळेने ‘ट्रेण्डसेटर ऑफ दी इयर’ असा गौरव केला आहे. ज्येष्ठ प्रशिक्षक ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड, अक्षय देवलकर व मयूर घाटणेकर, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे आणि ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या संपूर्ण टीमने विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com