पळसदरी-खोपोली रेल्वेस्थानकांवर तिसरी नजर

पळसदरी-खोपोली रेल्वेस्थानकांवर तिसरी नजर

कर्जत, ता. २५ (बातमीदार) : कर्जत ते खोपोली दरम्यानच्या रेल्वे स्थानकांवर ५० सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी पाठपुरावा केला होता.
रेल्वे स्थानकांवर एखादी घटना घडली की सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज घेऊन पोलिस यंत्रणा तपास करत असते. मात्र, कर्जत ते खोपोली दरम्यान पळसदरी, केळवली, डोलवली, लौजी आणि खोपोली या स्थानकांवर सीसी टीव्ही नसल्याने एखाद्या घटनेचा तपास करताना पोलिसांना अडचण येते. याबाबत कर्जत रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी यादव यांनी सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांच्याशी चर्चा केली होती. याचे गांभीर्य लक्षात घेऊन ओसवाल यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला. थोड्याच दिवसात त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने कर्जत ते खोपोली दरम्यानच्या रेल्वे स्थानकांच्या सर्व्हे केला. त्यानुसार लवकरच पळसदरी सात, केळवली तीन, डोलवली चार, लौजी तीन आणि खोपोली रेल्वे स्थानकावर ३२ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. दरम्यान, कर्जत रेल्वे स्थानकावर ३८ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळवले आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने कर्जत-खोपोली दरम्यान रेल्वे स्थानकांवर सीसी टीव्ही कॅमेरे लवकरच बसविणार असल्याचे कळविले आहे. असे असले तरी ते कॅमेरे बसवेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार आहे.
- पंकज मांगीलाल ओसवाल, सामाजिक कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com