
सदनिकेचा स्लॅब कोसळला दोन चिमुरडे जखमी
ठाणे, ता. २५ (वार्ताहर) : कळवा विटावा परिसरातील श्री साई निवास इमारतीमध्ये राहणाऱ्या आशिष सिंग यांच्या रूमचे प्लॉस्टर पडून दोन अल्पवयीन मुले जखमी झाल्याची घटना घडली. दोघांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना शनिवारी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. शनिवारी सूर्या नगर, कृष्णा मंदिराजवळील श्री साईनिवास इमारत आहे. या इमारतीचे बांधकाम १५ वर्ष जुने असलायची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. तर दुसरीकडे इमारतीच्या पहिल्या माळ्यावर भाड्याने राहणाऱ्या आशिष सिंग यांच्या रूमचे स्लॅबचे प्लॉस्टर कोसळल्याने अक्षित आशिष सिंग (वय ४) आर्या आशिष सिंग (वय ४) यांना दुखापत झाली. घटनास्थळी धाव घेत बांधकाम विभागामार्फत व अतिक्रम विभागामार्फत सदर रूम रिकामी करण्यात आली असून सील करण्याची कार्यवाही सुरू आहे. या रूममधील रहिवाशांनी त्यांची राहण्याची सोय त्यांच्या नातेवाईकांकडे केली असल्याची समजते.