जप्त केलेले ट्रक आगीत जळून खाक

जप्त केलेले ट्रक आगीत जळून खाक

अलिबाग, ता.२५ (बातमीदार) : तालुक्यातील झिराड येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत उभ्या असलेल्या ट्रकला आग लागल्याची घटना आज घडली. या आगीत ट्रक जळून भस्मसात झाले आहेत. उपप्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केलेला ट्रक गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी उभे होते. याप्रकरणी मांडवा सागरी पोलिस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली आहे. मांडवा पोलिस ठाण्याच्या बाजूला असलेल्या जागा ग्रामपंचायत मालकीची जागा आहे. या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून जप्त केलेला ट्रक उभा होता. शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास अचानक ट्रकने पेट घेतला. अचानक लागलेल्या आगीमुळे स्थानिकांची धावपळ उडाली. मोकळ्या जागेत वाढलेल्या गवताने पेट घेतल्याने ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग नियंत्रणात आणण्यास यश आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com