Sat, March 25, 2023

आर्चरीतील विजेत्यांचे आमदारांकडून अभिनंदन
आर्चरीतील विजेत्यांचे आमदारांकडून अभिनंदन
Published on : 27 February 2023, 10:20 am
विरार, ता. २७ (बातमीदार) : लंडन येथे नुकत्याच पार पडलेल्या आर्चरी विश्वचषकात वसई तालुक्यातील नायगावमधील धनुष सुभाष नायर याने सुवर्णपदक, तर मैत्रेयी जयंत सातघरे (वसई ) हिने खुल्या गटातील कंपाऊंड बो प्रकारात रौप्यपदक व सुभाष नायर याने कांस्यपदक मिळविले. या तिघांनी आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर यांची भेट घेतली. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव या तिघांनी उंचावले आहे. या स्पर्धेत ५६८ जणांनी संपूर्ण विश्वातून भाग घेतला होता. या तिन्ही विजयी स्पर्धकांचे व त्यांच्या पालकांचे आणि प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी केले.