डोंबिवलीत भंगार गोदामाला आग

डोंबिवलीत भंगार गोदामाला आग

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २६ : दावडी रोडलगत असलेल्या रिजन्सी चौकातील भंगाराच्या गोदामाला शनिवारी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत गोदामातील ड्रम आणि प्लास्टिकचे सामान जळून खाक झाले. शुक्रवारी रात्री एमआयडीसी फेज २ मधील एका कंपनीला आग लागली होती. याच्या दुसऱ्याच दिवशी भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे.
डोंबिवलीतील दावडीजवळील रिजन्सी चौकात हुसेन शमीन खान यांच्या मालकीचे भंगाराचे गोदाम आहे. या गोदामात प्‍लास्टिक सामान आणि रिकामे ड्रम मोठ्या प्रमाणात होते. शनिवारी दुपारी तीन वाजण्‍याच्या सुमारास या गोदामाला अचानक आग लागली. आगीचे वृत्त कळताच केडीएमसीच्या डोंबिवली एमआयडीसीतील अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड-दोन तासात आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत गोदामामधील संपूर्ण भंगार माल जळून खाक झाला. या आगीत जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किट झाल्यामुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
--------------------------------------------
गळफास घेऊन युवतीची आत्महत्या
मुरबाड, ता. २६ (बातमीदार) : मुरबाड शहरातील एका एकोणीस वर्षाच्या युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले. मुरबाड शहरातील मातानगर परिसरात शनिवारी ही घटना घडली. युसुफ अजय सिन्हा (वय १९) असे या युवतीचे नाव आहे. ही युवती लहान मुलांचा शिकवणी वर्ग घेत होती. युवतीच्‍या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी मुरबाड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com