
गुरु संगीत महाविद्यालयाचा वर्धापनदिन उत्साहात
विरार, ता. २६ (बातमीदार) : गुरू संगीत महाविद्यालयाचा ३४ वा वर्धापनदिन व पं. पलुस्कर, पं. भातखंडे यांच्या पुण्य स्मरणार्थ कार्यक्रम माणिकपूर येथील बी. के. एस. इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या प्रमिला कोकड, मराठी चित्रपट लेखक दिग्दर्शक व संगीतकार अभिजित जोशी, मॉर्निंग स्टार इंग्लिश हायस्कूलचे संस्थापक मंगेश पाटील आदी उपस्थित होते. या वेळी गुरुवर्य संगीतरत्न पंडित कुमार सुरुशे महाविद्यालयाच्या रजिस्ट्रार नमिता सुरुशे बोरकर उपस्थित होत्या. पं. सुरुशे यांनी महाविद्यालयाचे संगीतविषयक उपक्रम, परीक्षा याबाबत प्रास्ताविक केले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते २०२२ मध्ये अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या केंद्रातर्फे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुष्प देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती माहीमकर व मनोज भोळे यांनी केले.