Wed, March 22, 2023

राज्य परीक्षा परिषदमधील कारभारावर सरकारचे नियंत्रण आवश्यक
राज्य परीक्षा परिषदमधील कारभारावर सरकारचे नियंत्रण आवश्यक
Published on : 26 February 2023, 12:02 pm
मुलुंड, ता. २६ (बातमीदार) ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कारभारावर सध्या सडकून टीका होत आहे. याबाबत शिक्षणतज्ज्ञ रमेश खानविलकर यांनी माहिती देताना सांगितले की, ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमध्ये अनागोंदी कारभार सुरू असल्याच्या असंख्य तक्रारी शिक्षकांनी केल्या आहेत. अनेक आर्थिक गैव्यवहार समोर आले असून याबाबतच्या तक्रारी शिक्षकांनी हडपसर पोलिस ठाण्यामध्ये केल्या आहेत. दरम्यान, जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. याबाबत रमेश खानविलकर यांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना लेखी निवेदन दिले असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमधील अनागोंदी कारभारावर चाप लावावा आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.