मांज्यात अडकलेल्या घुबडाची सुटका

मांज्यात अडकलेल्या घुबडाची सुटका

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २६ ः पतंगाच्या मांज्यात अडकल्यामुळे जखमी झालेल्या घुबडाला येथील स्थानिक नागरिकांनी जीवदान दिले आहे. त्याची प्रकृती आता स्थिर असून त्याला रात्रीच्या वेळी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती पक्षिमित्र महेश बनकर यांनी दिली.
कल्याण गांधारी परिसरात रिंग रुटजवळील पुलाजवळ रस्त्यावर नागरिकांना रविवारी (ता.२६) एक पक्षी दिसला. त्याला उडता येत नसल्याचे काहींच्या लक्षात आले. त्याचा पाय मांज्यात अडकला होता, तसेच माणसांना पाहताच तो पळण्याचा प्रयत्न करत होता. ही माहिती पक्षिमित्र महेश बनकर यांना समजताच ते घटनास्थळी आले. त्यांनी त्याची मांज्यातून सुटका केली, तसेच त्याला पाणी पाजले. हा पक्षी प्राच्य शिंगाळा घुबड असल्याचे त्यांनी सांगितले. हे घुबड आकाराने इतर घुबडांपेक्षा लहान असते. त्याचे डोळे गडद पिवळे असून पंख गडद तपकिरी रंगाचे असतात. हे घुबड पूर्व आणि दक्षिण आशियात सर्वाधिक प्रमाणात आढळून येते. वन विभागास याची माहिती देण्यात आली असून रात्री त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com