Tue, May 30, 2023

कोईम्बतूर येथे रिअल इस्टेट कॉन्फरन्स
कोईम्बतूर येथे रिअल इस्टेट कॉन्फरन्स
Published on : 26 February 2023, 12:36 pm
मुंबई, ता. २६ : एनएआर-इंडिया नॅशनल असोसिएशन ऑफ रियाल्टर्स इंडियातर्फे मार्चमध्ये कोईम्बतूर येथे वार्षिक परिषद ‘नारविगेट २०२३’च्या १५व्या आवृत्तीची घोषणा करण्यात आली. हे अधिवेशन दोन दिवसांचे असून २०००हून अधिक उद्योगजक भागधारकांसह सहभागी होणार आहेत. ही कॉन्फरन्स रिअलटर्ससाठी भारतातील सर्वात मोठे व्यासपीठ असून, भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रातील वर्तमान आणि भविष्यातील ट्रेंडवर चर्चा करण्यासाठी उद्योगातील दिग्गज एकत्र येणार आहेत. पीएसजी कन्व्हेन्शन सेंटर येथे कोईम्बतूर असोसिएशन ऑफ रियल्टर्सद्वारे (कोरिया) ही परिषद आयोजित करण्यात येणार आहे.