Wed, June 7, 2023

मानखुर्दमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
मानखुर्दमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Published on : 26 February 2023, 2:00 am
अल्पवयीन मुलीवर मानखुर्दमध्ये अत्याचार
मानखुर्द, ता. २६ (बातमीदार) ः मानखुर्दच्या महाराष्ट्रनगर परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. शनिवारी (ता. २५) मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला होता. महाराष्ट्र नगर परिसरात राहणाऱ्या आरोपीने पीडित मुलीला काही दिवसांपूर्वी गोवंडीमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केले होते. पीडित मुलीने अत्याचाराबाबत कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. ट्रॉम्बे पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.