वसई विरार परिसरात फ्ल्यूची भीती

वसई विरार परिसरात फ्ल्यूची भीती

नालासोपारा, ता. २६ (बातमीदार) ः नालासोपारा परिसरात व्हायरल फ्ल्यूने लहान मुले आणि प्रौढ नागरिकही हैराण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे ताप, डोकेदुखी, पोटदुखी, उलटीचा त्रास उद्भवतो. या आजारात नागरिकांनी काळजी घ्यवी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

जानेवारी २०२३ पासून ताप, डोके दुखणे, अंगदुखी, पोटदुखी, खोकला आणि उलटी या लक्षणांनी अनेक नागरिक हैराण झाले आहेत. ही लक्षणे लहान मुलांमध्ये प्रकर्षाने जाणवत आहेत. लहान मुलांना १०१ ते १०४ डिग्री फॅरनाईटपर्यंत ताप वाढताना दिसून येत आहे. शाळा आणि सार्वजनिक ठिकाणावरून हा संसर्ग वाढत असल्याचे बालरोगतज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

व्हायरल फ्ल्यू या आजारामुळे महापालिका रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्याच्या वातावरणातील बदल याला कारणीभूत आहेत. लहान मुलांना जुलाब, उलटी, डोकेदुखी होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही लहान मुलांना पालिका रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत; पण प्रौढ व्यक्तींना जास्त लक्षणे जाणवत नसल्याने त्यांना ओपीडीमध्ये औषधोपचार करून घरी पाठवले जात असल्याचे वसई विरार महापालिकेच्या नालासोपारा पूर्व तुळिंज रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. कविता जगदाडा यांनी सांगितले आहे.
----
व्हायरल फ्ल्यूची लक्षणे
हा ताप २ वर्षे ते १८ वर्षाच्या मुलांना जास्त बाधित करत आहे. त्यामुळे जर ही लक्षण दिसली तर भरपूर प्रमाणात पाणी पिणे, तापाचे औषधे तात्काळ घेणे, खादी कपड्याने थंड पाण्याने अंग पुसून ओल्या कपड्याची पट्टी डोक्यावर ठेवणे, खोकला आणि सर्दी असेल, तर मास्क वापरणे गरजेचे असल्याचे बाल रुग्णालयाचे संचालक डॉ. किशन काळे यांनी सांगितले आहे.
---
सध्या व्हायरल फ्ल्यूचे लक्षण सर्वांनाच जाणवत आहे. वातावरणात अचानक झालेले बदल, त्यात रात्रीची थंडी आणि दिवसाची कडाक्याची गरमी हे याचे महत्त्वाचे कारण आहे. नागरिकांनी घाबरून न जाता ही लक्षणे जाणवली, तर जवळच्या महापालिका रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.
- डॉ. भक्ती चौधरी, आरोग्य अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com