शारदा इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शारदा इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात
शारदा इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

शारदा इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

sakal_logo
By

वासिंद, ता. २७ (बातमीदार) : वासिंद येथील विद्या विकास मंडळ संचालित शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन रविवारी मोठ्या उत्साहात पार पडले.
यावेळी विद्यार्थ्यांनी कोरोनाविरुद्ध यशस्वी लढा, भारतीय सैनिकांचे समर्पण, कुटुंब संस्थेचे महत्त्‍व, शाळेतील भावविश्व, छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा आदी विविध प्रेरणादायी विषयांवर नृत्य-नाटिका, तसेच भारतीय कला, संस्कृतीचे दर्शन घडविणारी बहारदार समूह नृत्ये सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या सादरीकरणात नर्सरी ते नववीच्या वर्गातील सुमारे ५५० विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत तारमळे, सेक्रेटरी रवींद्र शेलार, सदस्य विलास जगे, विठ्ठल सातवी, सुरेश रोठे यांच्यासह अनेक शाळांचे आजी-माजी मुख्याध्यापक, विविध संस्थांचे पदाधिकारी आदी मान्यवर, मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत जाधव यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. संजीव जाधव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी शाळेच्या सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.