
द्वारका विद्यामंदिरात ‘पर्व इतिहासाचे’ उपक्रम
कल्याण, ता. २७ (बातमीदार) : मराठी राजभाषा दिनानिमित्ताने द्वारका विद्यामंदिर माध्यमिक व बालविकास मंदिर प्राथमिक नांदिवली, कल्याण विद्यालयात दोन दिवसीय ‘पर्व इतिहासाचे’ हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी संस्थापक दत्तात्रय दळवी, संचालिका मीरा दळवी, स्वप्नील दळवी, व्यवस्थापिका सीमा दळवी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रकाश धानके, राघव राव, प्रभाकर उपाध्याय, उमेश कोलेटी, विनोद सोनावणे, उमाकांत चौधरी, संतोष खामकर आदी मान्यवर उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर माऊली व कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर संस्थापक दळवी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेतली.