उल्हासनगरात अधिनियम मार्गदर्शन कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात अधिनियम मार्गदर्शन कार्यशाळा
उल्हासनगरात अधिनियम मार्गदर्शन कार्यशाळा

उल्हासनगरात अधिनियम मार्गदर्शन कार्यशाळा

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. २८ (वार्ताहर) : राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात शहरातील अनधिकृत बांधकामांना नियमितपणे करण्यासाठी अधिनियम पारित केला आहे. मात्र विकसक, वास्तुविशारद, नागरिक यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे बांधकामांच्या नियमितीकरणास गती देण्यासाठी अधिनियम समजणे ही खऱ्या अर्थाने काळाची गरज असल्याचे पालिका आयुक्त अजीज शेख यांनी स्पष्ट केले.
अधिनियमाबाबत वास्तुविशारद, विकसक व नागरिकांना पुरेशी माहिती नसल्याने प्रशासक-आयुक्त अजीज शेख यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेचे प्रभारी सहायक संचालक नगररचना प्रकाश मुळे यांनी कार्यशाळेचे आयोजन केले होते. या वेळी आमदार कुमार आयलानी, गणपत गायकवाड, डॉ. बालाजी किणीकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. करुणा जुईकर, भाजप जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी, माजी स्थायी समिती सभापती राजेश वधारिया उपस्थित होते. त्या वेळी अजीज शेख अधिनियमाविषयी मार्गदर्शन करत होते. या अधिनियमाची वास्तुविशारद, विकसक, नागरिक यांना सहज-सोप्या भाषेत माहिती व्हावी, त्यांनी सूचना, हरकती नोंदवल्यास त्यांचे म्हणणे राज्य सरकारपर्यंत पोहोचावे, हा या कार्यशाळेचा उद्देश असल्याचे अजीज शेख यांनी सांगितले.