Wed, May 31, 2023

भूमी भानुशालीची चमकदार कामगिरी
भूमी भानुशालीची चमकदार कामगिरी
Published on : 27 February 2023, 11:01 am
वसई, ता. २७ (बातमीदार) : जळगाव येथे माउंट कार्मेल स्कूल ज्युनियर कॉलेज इंटरस्कूल तायक्वांदो राज्यस्तरीय चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात वसईची भूमी भानुशाली हिने चकमदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले आहे. पालघर तायक्वांदो असोसिएशनचे मुख्य प्रशिक्षक, सचिव राजा मकवाना यांच्या नेतृत्वाखाली भूमी सराव करत आहे. खेळासाठी मेहनत व एकाग्रतेमुळे जळगाव येथील स्पर्धेत राज्यस्तरीय पदक मिळवले. असोसिएशनचे विश्वस्त शिबू नायर, प्रकाश वनमाळी, प्राचार्या सुची अग्रवाल, पीटीए अध्यक्ष अगिल चाको, व्हीपी बाली शर्मा, आमदार क्षितिज ठाकूर यांनी तिच्या यशाचे कौतुक केले.