
‘अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करा’
कल्याण, ता. ७ (बातमीदार) : कल्याण शहरातील पूर्वेकडील अनेक भागांत अनधिकृत होर्डिंगचे पेव फुटले आहे. शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांवर कारवाई करा; अन्यथा ड प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोर बॅनर लावून आंदोलन करू, असा इशारा श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान महाराष्ट्र विद्यार्थी तक्रार निवारण प्रमुख अक्षय सोनवणे यांनी पालिकेला दिला आहे.
कल्याण पूर्व भागात पालिकेचे ड आणि जे अशी दोन प्रभाग क्षेत्र कार्यालये आहेत. अवैध बांधकामांचे पेव फुटले असताना प्रमुख चौकात, आरक्षित भूखंड, शौचालय, खासगी इमारत परिसरात पालिकेची परवानगी न घेता बेकायदा अनधिकृत होर्डिंगचे जाळे निर्माण झाले आहे. श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान महाराष्ट्र विद्यार्थी तक्रार निवारणप्रमुख अक्षय सोनवणे यांनी पालिकेकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता बेकायदा होर्डिंगचा प्रश्न समोर आला आहे. शहरात बेकायदा होल्डिंगचे पेव फुटल्याचे अक्षय सोनवणे यांनी पालिकेकडे मागितलेल्या माहितीच्या अधिकारांतर्गत माहितीत उघड झाले आहेत. त्याबाबत पालिका प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असल्याचे सोनवणे यांचे म्हणणे आहे. याबाबत पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना निवेदन देण्यात आले असून, आगामी १५ दिवसांत कारवाई न केल्यास कल्याण पूर्व भागामधील प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोर बॅनर लावून आंदोलन करणार असल्याचा इशारा अक्षय सोनवणे यांनी दिला आहे.
--------------------------------
क्षेत्र अधिकृत होर्डिंग्ज विनापरवाना
कल्याण पूर्व १२ ८
कल्याण पश्चिम ७१ ४८
डोंबिवली ४३ २९