श्वान निर्बीजीकरणाची केंद्राची क्षमता वाढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्वान निर्बीजीकरणाची केंद्राची क्षमता वाढणार
श्वान निर्बीजीकरणाची केंद्राची क्षमता वाढणार

श्वान निर्बीजीकरणाची केंद्राची क्षमता वाढणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : ठाणे शहर दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अशा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठाणे पालिकेच्या पशु वैद्यकीय विभाग कार्यरत आहे. त्यातच भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी वागळे इस्टेट येथील श्वान निर्बीजीकरण केंद्राचे सक्षमीकरण करून त्याची क्षमता वाढविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या केंद्राची श्वान ठेवण्याची क्षमतेत १४ ने वाढ होणार आहे.
ठाणे शहरातील विविध भागात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांकडून बालकांसह वयोवृद्ध नागरिकांना आपले लक्ष करीत आहेत. त्यात अपुऱ्या साहित्य सामुग्री व मनुष्यबळामुळे अनेकदा अशा भटक्या कुत्र्यांना आळा बसविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच मागील दोन ते तीन वर्षपासून भटक्या कुत्र्यांची निर्बिजीकरण शस्त्रक्रिया देखील बंद असल्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न जटील झाला होता. याची दाखल घेत, तत्कालीन ठाणे महापलिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी मागील वर्षी अर्थसंकल्पात श्वान नियंत्रण विभागाच्या सक्षमीकरणावर देखील विशेष भर दिला आहे. त्यानुसार श्वान नियंत्रण विभागाला श्वान पकडण्यासाठी वाहन खरेदी करण्याबरोबरच श्वान केंद्रच्या डागडुजी करणे, भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण करणे आदींसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे पालिकेचे वागळे इस्टेट येथील श्वान निर्बीजीकरण केंद्राचे देखील सक्षमीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अशातच मागील दोन ते तीन वर्षापासून बनाद असलेली निर्बीजीकरण प्रक्रिया मार्च २०२२ पासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

दरम्यान, सध्याच्या घडीला ठाणे पालिकेचे वागळे इस्टेट येथील श्वान निर्बीजीकरण केंद्र आहे. या केंद्रात निर्बीजीकरणासाठी ७४ श्वान ठेवता येईल इतकी क्षमता आहे. मात्र, मागील दोन ते तीन वर्षापासून बंद असलेले निर्बिजीकरण यांमुळे शहरत भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेली संख्या अपुरी पडत असल्याचे निदर्शनास आले असल्याने येथील श्वान ठेवण्याची क्षमता १४ ने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता ७४ वरून श्वान ठेवण्याची संख्या ८८ इतकी होणार आहे. यासाठी तीन वर्षाच्या कालावधीसाठी दीड कोटींच्या निधीची तरतूद देखील करण्यात आली असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.