Tue, May 30, 2023

पडघ्यात मराठी शाळेतील शिक्षकांचा सत्कार
पडघ्यात मराठी शाळेतील शिक्षकांचा सत्कार
Published on : 27 February 2023, 10:59 am
पडघा, ता. २७ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील पडघा येथे मनसेच्या वतीने मराठी शिक्षकांचा सत्कार व मुलांना खाऊवाटप करून मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवारी (ता. २७) मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद मराठी शाळा पडघा येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शैलेश बिडवी, रवींद्र विशे, गुरुनाथ मते, प्रताप विशे, रश्मी तेलवणे, गुरुनाथ मोरे, अविनाश जाधव, अनिल टिटमे उपस्थित होते.