Sat, June 3, 2023

सत्पाळा येथे ग्रंथदिंडी
सत्पाळा येथे ग्रंथदिंडी
Published on : 27 February 2023, 11:16 am
विरार, ता. २७ (बातमीदार) : मराठी भाषा दिनानिमित्त सत्पाळा येथील संत जोसेफ महाविद्यालयात ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पारंपरिक पोशाखात महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. महाविद्यालयातर्फे आयोजित ग्रंथदिंडीचे यंदाचे १३ वे वर्ष होते. या निमित्त सत्पाळा नाका ते सेंट जोसेफ महाविद्यालयापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून वैष्णवी राऊत उपस्थित होत्या. प्राचार्य डॉ. प्रकाश डोंगरे, उपप्राचार्य डॉ. सुभाष डिसोझा, आईक्यूएसी समन्वयक डॉ. दिनेश सनदी, ज्ञानदीप मंडळ सचिव अँण्ड्रू लोपीस, मराठी वाड्मय मंडळ विद्यार्थी प्रमुख आस्था मेश्राम यांच्यासह इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.