Fri, June 9, 2023

फादर स्टीफन अकॅडमी शाळेत कविता गायन स्पर्धा
फादर स्टीफन अकॅडमी शाळेत कविता गायन स्पर्धा
Published on : 27 February 2023, 11:23 am
विरार, ता. २७ (बातमीदार) : वसई गिरीज येथील फादर स्टीफन्स अकॅडमी स्कूलमध्ये मराठी भाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यासाठी कविता स्पर्धा ठेवण्यात आली होती. या वेळी विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील त्याचप्रमाणे इतरही कविता सादर केल्या. यशस्वी विद्याथ्यांना प्रशस्तिपत्रे देऊन गौरविण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना "उबुंटू'' हा चित्रपट दाखविण्यात आला. स्पर्धेत चौथी ते सहावी गटात अनन्या सुळे प्रथम, आदर्श टाकले द्वितीय आणि एंजल कोलासो हिने तृतीय क्रमांक पटकावला. सातवी ते नववीच्या गटात नंदिनी घोडके प्रथम, रिंकी चौधरी द्वितीय व जैनीश वर्तक याने तृतीय क्रमांक पटकावला.