ठाण्यात घुमला मराठीचा गजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात घुमला मराठीचा गजर
ठाण्यात घुमला मराठीचा गजर

ठाण्यात घुमला मराठीचा गजर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी... असा सूर आज ठाण्यासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमातून घुमला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अनेक संस्थांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. काव्य संमेलन, शाळकरी विद्यार्थ्यांनी काढलेली दिंडी, अभिजात दर्जा मिळावा यासाठी सह्यांची मोहीम असे अनेक कार्यक्रमांची रेलचेल दिवसभर होती. यामध्ये समाजमाध्यमेही मागे नव्हती. अनेकांनी आपल्या माय मराठीची पताका सोशल मीडियावर फडकवत सुंदर संदेश देत मरा‍हाटीचा जागर करण्याचा प्रयत्न केला.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ठाण्यातील बहुतेक शाळांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पारंपारिक वेशभूषा करून आलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर सह्यांची मोहीम राबवली. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशी भावना यामागे होती. ठाणेकर प्रवाशांनीही या मोहिमेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला.