कासा हायस्कूलमध्ये भाषा गौरव दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासा हायस्कूलमध्ये भाषा गौरव दिन
कासा हायस्कूलमध्ये भाषा गौरव दिन

कासा हायस्कूलमध्ये भाषा गौरव दिन

sakal_logo
By

कासा, ता. २७ (बातमीदार) : कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त कासा येथील आचार्य भिसे विद्यालयात मराठी भाषा दिनानिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर करण्यात आली. तसेच मराठी भाषेबद्दल गीत सादर करण्यात आले. या वेळी संस्थेचे सचिव पांडुरंग बेलकर, माजी विद्यार्थी अविनाश पाटील, मुख्याध्यापक भरत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा गौरव दिनबद्दल मार्गदर्शन केले व कवी कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती दिली.