मध्य रेल्वेने हरविलेल्या १३९९  मुलांची केली घरवापसी!

मध्य रेल्वेने हरविलेल्या १३९९ मुलांची केली घरवापसी!

हरवलेल्या १३९९ मुलांची
मध्य रेल्वेतर्फे घरवापसी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मध्य रेल्वेच्या सुरक्षा बलाने पोलिस आणि इतर फ्रंटलाईन रेल्वेच्या समन्वयाने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत गेल्या दहा महिन्यांत १३९९ मुलांची सुटका केली आहे. त्यामध्ये ९४९ मुले आणि ४५० मुलींचा समावेश आहे. मोहिमेसाठी आरपीएफला चाईल्डलाईनसारख्या स्वयंसेवी संस्थेची मदत झाली.
‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत हरवलेल्या वा घरातून पळून आलेल्या मुलांच्या सुटकेसाठी इतर यंत्रणा आणि संस्थांच्या मदतीने आरपीएफ काम करत आहे. यंदा आरपीएफ पोलिसांनी जानेवारी ते डिसेंबर २०२२ दरम्यान मध्य रेल्वेवरील स्थानके आणि फलटांवरील एक हजार ३९९ मुलांची सुटका केली आहे.
मध्य रेल्वे स्थानक परिसरात हरवलेल्या मुलांशी संपर्क साधून, त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांनी आपल्या कुटुंबासोबत जाण्यासाठी त्यांचे समुपदेशन करत आहोत. आरपीएफ आणि फ्रंटलाईन कर्मचारी समुपदेशक म्हणून त्वरित कार्यवाही करतात, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

घरी परतलेली मुले
- मुंबई विभाग ः ६१५ मुले (मुले ४४१ आणि मुली १७४)
- भुसावळ विभाग ः २८४ मुले (मुले १५० आणि मुली १३४)
- पुणे विभाग ः २८५ मुले (मुले २३३ आणि मुली ५२)
- नागपूर विभाग ः १५७ मुले (मुले ८९ आणि मुली ६८)
- सोलापूर विभाग ः ५८ मुले (मुले ३६ आणि मुली २२)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com