दहा मार्चला डहाणूत आमसभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहा मार्चला डहाणूत आमसभा
दहा मार्चला डहाणूत आमसभा

दहा मार्चला डहाणूत आमसभा

sakal_logo
By

डहाणू, ता. २७ (बातमीदार) : तालुक्यात तब्बल पाच वर्षानंतर १० मार्चला आमदार विनोद निकोले यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा घेण्यात येणार आहे. याबाबतचे निमंत्रण डहाणू पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी काढले आहे.
डहाणू तालुक्यातील पंचायत समितीच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचा आढावा या सभेत घेण्यात येणार आहे. डहाणू तालुका हा डहाणू विधानसभा मतदारसंघ आणि पालघर विधानसभा मतदारसंघात विभागला गेल्यामुळे या आमसभेला आमदार विनोद निकोले आणि आमदार श्रीनिवास वनगा हे उपस्थित राहणार आहेत. डहाणू पंचायत समितीची २०१६-२०१७ या आर्थिक वर्षाची आमसभा २०१८ मध्ये पार पडली होती. त्यानंतर विधानसभा ,जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका, कोरोना अशा विविध कारणांनी गेल्या पाच वर्षांत आमसभा झाली नव्हती. आता १० मार्चला पार पडणाऱ्या आमसभेला तब्बल ५३ विविध खाते प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे