बोली आणि लिपींमधून भाषा प्रवाही होत जाते!

बोली आणि लिपींमधून भाषा प्रवाही होत जाते!

कांदिवली, ता. २७ (बातमीदार) ः मराठी राजभाषा दिनानिमित्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयांच्या दादर पूर्व परिसरातील संदर्भ विभागात मराठी भाषेच्या बोली, लिपी इत्यादींवर आधारित विषयांवर विविध ग्रंथ व लेखांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले. भाषाविषयक प्रदर्शन पाहून समाधान झाले. निरनिराळ्या बोली आणि लिपींमधून भाषा कशी प्रवाही होत जाते हे कळते, असे ते म्हणाले.

‘सातशे वर्षांपूर्वी भाषेचा प्रश्न येत नव्हता. माणूस प्रवास करीत अगदी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालला तरी भाषा येत नाही म्हणून त्याचे अडले नाही. ब्रिटिशांनी सुधारणा करायला सुरुवात केल्यावर भाषेवर बंधने आली. भाषा बंदिस्त होऊ लागली. मराठी माणूस जिथे गेला तिथे सोबत मराठीतील शब्दही गेले,’ असे मत डॉ. नेमाडे यांनी व्यक्त केले. राज्याराज्यांत असलेल्या मराठी भाषकांचा सरकारने भाषांतरासाठी उपयोग करून घ्यावा,’ अशी सूचनाही त्यांनी केली. याप्रसंगी साहित्यिक रंगनाथ पाठारे, जयप्रकाश सावंत, प्रफुल्ल शिलेदार, प्रमोद मुनघाटे, संस्थेचे विश्वस्त प्रताप आसबे, संदर्भ कार्यवाह उमा नाबर आणि अभ्यासक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

प्रदर्शन २८ फेब्रुवारी ते ४ मार्चपर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ६ दरम्यान पाहता येणार आहे. अभ्यासक आणि साहित्यप्रेमींनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com