वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की; दोन आरोपींना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की; दोन आरोपींना अटक
वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की; दोन आरोपींना अटक

वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की; दोन आरोपींना अटक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : वाहतूक पोलिसाला कर्तव्यावर असताना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोन आरोपींना घाटकोपर पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. प्रमोद शिंदे व संघमित्रा शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील फिर्यादी अंकुश हांडे मुंबई पोलिस दलातील वाहतूक विभागात कार्यरत आहे.
शनिवारी (ता. २५) रात्री १०.१५ च्या सुमारास अंकुश हांडे हे असल्फा जंक्शन, घाटकोपर पश्चिमेला वाहतुकीचे नियमन करत होते. तेव्हा आरोपी प्रमोद दाजी शिंदे व संघमित्रा प्रमोद शिंदे हे दुचाकीवरून येत होते. आरोपींच्या दुचाकीला नंबर प्लेट नसल्यामुळे आणि पोलिस तपासणी करत आहेत हे पाहून दुचाकी विरुद्ध दिशेने नेली. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. अंकुश हांडे यांनी वाहन बाजूस घेण्यास बजावल्यावर वाद झाला. संघमित्र शिंदेने अंगावर धावून धक्काबुक्की केली. शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकी देत आरोपी पळून गेले. सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलिसांनी आरोपींना अटक केली.