एक्स्प्रेसच्या मार्गात बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक्स्प्रेसच्या मार्गात बदल
एक्स्प्रेसच्या मार्गात बदल

एक्स्प्रेसच्या मार्गात बदल

sakal_logo
By

मुंबई, ता. २७ : दिल्ली-गाझियाबाद-मेरठ शहर-सहारनपूर सेक्शनमधील देवबंद स्थानकांदरम्यान नॉन-इंटरलॉकिंग कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्र. १२९०३ मुंबई सेंट्रल-अमृतसर ‘गोल्डन टेम्पल’ एक्स्प्रेस हजरत निजामुद्दीन-नवी दिल्ली-पानिपत-अंबाला कॅंटमार्गे वळवण्यात येणार आहे. ट्रेन क्र. १४३१० डेहराडून-उज्जैन ‘उज्जैन एक्स्प्रेस’ टपरी-शामली-दिल्ली शाहदरा-टिळक ब्रिज-हजरत निजामुद्दीनमार्गे वळवण्यात येणार आहे. ट्रेन क्र. १४३०९ उज्जैन-डेहराडून ‘उज्जैन एक्स्प्रेस’ हजरत निजामुद्दीन-टिळक ब्रिज-दिल्ली शाहदरा-नोली-शामली-टापरीमार्गे वळवण्यात येणार आहे.