राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा गौरव
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा गौरव

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा गौरव

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २७ : नेहरू विज्ञान केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी २२ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांसाठीही संपूर्ण आठवडाभरात प्रदर्शन, व्याख्याने, विज्ञान प्रश्नमंजुषा, घोषवाक्य लिहिण्याची स्पर्धा, कार्यशाळा, पथनाट्ये यांसारख्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम विज्ञान दिनाच्या निमित्ताने नेहरू विज्ञान केंद्र येथे होणार आहे.

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने यंदा ‘ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबिंग’ अशी संकल्पना ठेवण्यात आली आहे. मानवी कल्याणासाठी जागतिक पातळीवर संशोधन आणि नावीन्यपूर्ण संकल्पना विकसित करण्याच्या अभ्यासक्रमाला चालना देणारी यंदाच्या वर्षाची संकल्पना आहे. रोजच्या जगण्यातील सोप्या विज्ञानाचा वापर या सगळ्या स्पर्धांची थीम होती. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाकडे अधिकाधिक लोकांनी आकर्षित व्हावे असा या जागरुकतेचा उद्देश होता. सोबतच मुलांना वैज्ञानिकांशी, तज्ज्ञांशी आणि विविध क्षेत्रांतील अभ्यासकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि सामान्य लोकांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली.