घाटकोपर, भांडुपमध्ये २ मार्चला पाणीपुरवठा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाटकोपर, भांडुपमध्ये २ मार्चला पाणीपुरवठा बंद
घाटकोपर, भांडुपमध्ये २ मार्चला पाणीपुरवठा बंद

घाटकोपर, भांडुपमध्ये २ मार्चला पाणीपुरवठा बंद

sakal_logo
By

मुंबई, ता. २७ : मुंबईतील काही विभागांत पाणीपुरवठा सुरळित करण्यासाठी एस आणि एन विभागात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे घाटकोपर, विक्रोळी, भांडुप येथील काही परिसरांमध्ये २ मार्च रोजी मध्यरात्री १२ ते ३ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. महापालिकेतर्फे २ मार्च रोजी भांडुप (पश्चिम) एस विभागातील क्वारी रोड या ठिकाणी १२०० मिलिमीटर व ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्ती कामामुळे गुरुवारी २ मार्च रोजी मध्यरात्री १२ पासून शुक्रवारी, ३ मार्च रोजी मध्यरात्री १२ पर्यंत एस आणि एन विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा खंडित राहील. संबंधित परिसरातील नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.