शहापूर तालुक्यात शेतकऱ्यांने सेंद्रिय पद्धतीने केली हळद लागवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापूर तालुक्यात शेतकऱ्यांने सेंद्रिय पद्धतीने केली हळद लागवड
शहापूर तालुक्यात शेतकऱ्यांने सेंद्रिय पद्धतीने केली हळद लागवड

शहापूर तालुक्यात शेतकऱ्यांने सेंद्रिय पद्धतीने केली हळद लागवड

sakal_logo
By

सेंद्रीय पद्धतीने हळद लागवड
शहापूर तालुक्यात शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

खर्डी, ता. १ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील खर्डी विभागात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कमी खर्च व कमी मेहनत करून हळदीचे पिक घेऊन लाखो रुपयांचा आर्थिक फायदा घेत आहेत. राज्यात पूर्वी काही पिकांची विशिष्ट भागातच लागवड केली जात असे. आता मात्र पीक पद्धतीत बदल होत असून सांगली-सातारा, विदर्भ, मराठवाडा, भागात घेतल्या जाणाऱ्या हळदीची लागवड आता कोकणातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात पाहायला मिळत आहे.
किचकट मानले जाणारे हळद उत्पादन आता शेतकऱ्यांना लोखोंचे उत्पन्न देत आहे. शहापूर तालुक्यातील बेडेकोन येथील शेतकरी रामनाथ उंबरगोंडे यांनी सुरूवातीला अर्धा एकरमध्येच प्रगती जातीच्या हळदीची लागवड केली असून सर्व खर्च वजा करून त्यांना दोन लाख रुपये उत्पन्न मिळाले. तसेच टेंभा येथील शेतकरी प्रकाश कोर यांनी १० गुंठ्यात वायगाव जातीच्या हळदीची लागवड केली. सर्व खर्च वजा जाऊन त्यांना एक लाख रुपये उत्पन्न मिळाले.

---------------------
अनेक शेतकऱ्यांचा पुढाकार
पूर्वी हळद काढणीची प्रक्रिया अवघड असल्याने शेतकरी लागवडीला कचरत असत. नवखे शेतकरी हळदीचा विचारही करत नव्हते. आता मात्र ठाणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी पुढे सरसावले असून हळदीची पिके घेत एकरी आठ ते दहा लाख रुपयांचेही उत्पन्न घेत आहेत. हळद ही शेतावर अंतरपीक म्हणूनही घेता येते. हळदीच्या काढणीसाठी लागणारे मनुष्यबळ, काढणी झाल्यावर शिजवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लागणार लाकूडफाटा, तसेच सदर हळद सुकवून पुन्हा मशीनमध्ये तिची पावडर बनवून ती पॅकिंग करून विक्री साठी बाजारात आणली जाते. हळद ही पूर्ण पणे सेंद्रीय असल्यामुळे तिला बाजारात एका किलो मागे ४०० ते ५०० रुपये भाव मिळत आहे.

------------------
शहापूर तालुक्यात उन्हाळी व पावसाळी भात पीक घेतले जाते; परंतु त्यासोबत हळद पीक घेतल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. या बरोबर कृषी विभागामार्फत सबसिडीदेखील मिळते. म्हणून शेतकऱ्यांनी कमी मेहनतीत जास्त आर्थिक फायदा मिळवण्यासाठी हळद पीक घ्यावे.
-रामनाथ उंबरगोंडे, शेतकरी बेंडेकोन