जाहिरात फलकांसाठी झाडांची कत्तल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहिरात फलकांसाठी झाडांची कत्तल
जाहिरात फलकांसाठी झाडांची कत्तल

जाहिरात फलकांसाठी झाडांची कत्तल

sakal_logo
By

खारघर, ता. १ (बातमीदार) : महामार्गालगतचे जाहिरात फलक दिसावेत, यासाठी रस्त्यांलगतच्या झाडांची सर्रासपणे कत्तल केली जात आहे. सायन-पनवेल महामार्गावरील खारघर हिरानंदानीकडून कळंबोलीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत अशाच प्रकारे शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर पनवेल महापालिकेच्या पर्यावरण विभागाने कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.
सायन-पनवेल महामार्गावर खारघर हिरानंदानीकडून कळंबोलीकडे जाणाऱ्या मोठ्या संख्येने जाहिरातींचे फलक लावण्यात आले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या या फलकांमध्ये खारघर सेक्टर पंधरा घरकुललगत असलेल्या कोपरा तलाव आणि स्पॅगेटीकडून कोपरा खाडी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या विविध झाडांमुळे अडसर ठरत होता. त्यामुळे महामार्गाने जाणाऱ्या प्रवाशांच्या निदर्शनास जाहिरात फलक पडत नसल्याने अज्ञातांकडून या झाडांची तोड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराकडे पनवेल महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित ठिकाणाचा पंचनामा करून गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.
--------------------------------------------------
पनवेल पालिकेने गेल्या पाच वर्षांत पर्यावरणाचा साधा अहवाल प्रसिद्ध केलेला नाही. अशातच रस्त्यालगतच्या झाडांची कत्तल केली जात आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचे पालिकेला काही गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.
- नरेश सिंग, पर्यावरणप्रेमी