क्रीडा महोत्सवात १२ हजार स्पर्धकांचा सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रीडा महोत्सवात १२ हजार स्पर्धकांचा सहभाग
क्रीडा महोत्सवात १२ हजार स्पर्धकांचा सहभाग

क्रीडा महोत्सवात १२ हजार स्पर्धकांचा सहभाग

sakal_logo
By

पालघर, ता. २८ (बातमीदार) : १७ वा बोईसर कला-क्रीडा महोत्सव खोदाराम बाग मैदान, डॉन बॉस्को स्कूल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, लंगडी, थ्रो बॉल, कराटे, बुद्धिबळ, लोकनृत्य, समूहनृत्य, समूहगान, भजन, एकपात्री अभिनय, चित्रकला अशा विविध कला-क्रीडा प्रकारातील ११३ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे १२ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
तीन दिवस चाललेल्या या महोत्सवाला आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश शहा, माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, माजी सभापती अशोक वडे, पालघरचे गट विकास अधिकारी याचबरोबर अनेक मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या महोत्सवांमध्ये खुल्या गटातील कबड्डी स्पर्धा इच्छाशक्ती, नालासोपारा या संघाने; तर व्हॉलीबॉल स्पर्धा आरपीटी, बोईसर या संघाने जिंकल्या. महिलांची थ्रोबॉल स्पर्धा स्त्री शक्ती संघ, विद्यानगरने जिंकली.
महोत्सवामध्ये मानाचा ठरलेला क्रीडा श्री पुरस्कार सेवाश्रम, मुरबे या शाळेतील क्रीडा शिक्षक राजेंद्र पाटील, पाम कुंभवली विभाग हायस्कूलमधील समीर मधुकर पिंपळे यांना प्रदान करण्यात आला. महोत्सवाच्या समारोपप्रसंगी आमदार राजेश पाटील यांनी बोईसर कला-क्रीडा महोत्सव ही ग्रामीण पालघर जिल्ह्याची शान असल्याचे गौरवोद्‌गार काढले. अध्यक्ष संजय पाटील यांनी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनामध्ये सहभागी सर्व पदाधिकारी, देणगीदार, कार्यकर्ते तसेच सहभागी शाळा व शिक्षकवृंदाचे आभार मानले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष डॅरल डिमेलो, उपाध्यक्ष गजानन देशमुख, हेमंत मुंजे, कमळाकर पाटील, नरेंद्र घरत, आशिष पाटील, सतेंद्र यादव, तसेच जि. प. सदस्य महेंद्र भोणे, प. स. उपसभापती मिलिंद वडे, अतुल देसाई, नापेश संखे, शाम संखे, सचिन पिंपळे, दशरथ सुतार, अशोक बाबर यांचे योगदान उल्लेखनीय राहिले.